अक्षय्य तृतीयाच्या दुसऱ्याच दिवशी १ मे रोजी सोने स्वस्त झाले आहे. १ मे २०२५ रोजी सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही महिन्यांपासून गगनाला भिडले होते. ज्यामुळे सामान्य ग्राहकांच्या खिशाला झळ बसत होती. मात्र, अक्षय्य तृतीयेनंतर सोन्याच्या दरात घसरण झाली असून, यामुळे ग्राहकांच्या खिशाला काहीसा दिलासा मिळू शकतो.
कालच्या तुलनेत आज सोन्याचा दर तब्बल २,३०० रूपयांनी कमी झाला आहे. सध्या २२ कॅरेट सोन्याचा दर ८७,७०० रूपये प्रति १० ग्रॅम आहे, तर २४ कॅरेट सोन्याचा दर ९५, ७०० रूपये प्रति तोळा इतका आहे.
सोन्याच्या किमतीसह चांदीच्या किमतीतही घसरण झाली आहे. चांदीचा भाव ९९,९०० रूपये किलो इतका आहे. चांदीच्या दरात घसरण झाल्यामुळे १ लाखांवर पोहोचलेला दर आता उतरला आहे. सोन्याच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी हालचाल वाढण्याची शक्यता आहे.