सोन्याने पुन्हा भाव खाल्ला! १० तोळ्याच्या दरात 'इतक्या' रुपयांनी वाढ , आजचा दर किती? वाचा
सोन्याने पुन्हा भाव खाल्ला! १० तोळ्याच्या दरात 'इतक्या' रुपयांनी वाढ , आजचा दर किती? वाचा
img
DB
सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा वाढ व्हायला सुरूवात झाली आहे. सोन्याचे दर एक लाखांपार गेले आहेत. त्यामुळे लग्नसराईसाठी सोनं खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.

आज पु्न्हा सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रती तोळा २८० रुपयांनी वाढ झाली आहे. तर १० तोळे सोन्याच्या दरात २,८०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करताना आता ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागत आहे.  

आजचे १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर किती?

गुडरिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा २८० रुपयांनी वाढ झाली आहे. २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी १,०१,६८० रुपये मोजावे लागणार आहे. शुक्रवारी २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी १,०१,४०० रुपये खर्च करावे लागले. तर हेच २४ कॅरेटचे १० तोळे सोन्याच्या दरामध्ये २,८०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी १०,१६,८०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

आज २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा २५० रुपयांनी वाढ झाली आहे. २२ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी ९३,२०० रुपये मोजावे लागणार आहेत. २२ कॅरेटचे १० तोळे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला ९,३२,००० रुपये खर्च करावे लागतली.

तर १८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा २१० रुपयांनी वाढ झाली आहे. १८ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला ७६,२६० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

तर आज भारतात चांदीची किंमत प्रति ग्रॅम ११० रुपये आणि प्रति किलोग्रॅम १,१०,००० रुपये इतकी झाली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group