दिवसेंदिवस सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांनी सोनेखरेदीकडीकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे. १ तोळा सोन्याचे १ लाख रुपये मोजावे लागत आहे. सोन्याचे दर भविष्यातदेखील असेच वाढत जातील, असं सांगितलं जात आहे.परंतु सोन्याचे भाव सध्या एवढे वाढत आहेत की, हे सर्वसामान्यांना परवडण्याजोगे नाही आहे.
गुडरिटर्न्सनुसार, आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सलग दोन दिवसांपासून सोन्याचे दर घसरले आहेत. आज १ तोळा सोन्याच्या दरात ५५० रुपयांनी घसरण झाली आहे. १० तोळा सोन्याचे दर ५५०० रुपयांनी घसरले आहेत.
१८ कॅरेट सोन्याचे दर
१८ कॅरेट सोन्याच्या दरात ४१० रुपयांनी घसरण झाली आहे. १ तोळा सोन्याची किंमत ७४,९५० रुपये आहेत. १० तोळा सोन्याचे दर ४१०० रुपयांनी घसरले आहेत. १० तोळा सोन्याचे दर ७,४९,५०० रुपये झाले आहेत.
२२ कॅरेट सोन्याचे दर
आज २२ कॅरेट सोन्याचे दर ५०० रुपयांनी घसरले आहेत. १ तोळा सोन्याचे दर ९१,६०० रुपये आहेत. १० तोळा सोन्याचे दर ९,१६,००० रुपये आहेत. या दरात ५००० रुपयांनी घसरण झाली आहे.
२४ कॅरेट सोन्याचे दर
आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. १ तोळा सोन्याचे दर ९९,९३० रुपये झाले आहेत. या दरात ५५० रुपयांची घसरण झाली. १० तोळा सोन्याचे दर ९,९९,३०० रुपये आहेत. हे दर ५,५०० रुपयांनी घसरले आहेत.