राज्यात एकीकडे मतदान प्रक्रिया पार पडत आहे , महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात कुठे किती मतदान झाले, याची आकडेवारी समोर आली आहे.अशातच दुरीकडे सोन्याचे भाव वाढल्याची बातमी समोर आली आहे सोन्याने महागाईला मत दिल्याचं चित्र आहे.
गेल्या आठवड्यामध्ये सोन्याच्या भावात घट पाहायला मिळाली होती. तर आज, कालच्या तुलनेत सोन्याच्या भावात वाढ झाल्याचं दिसून आलंय. कालच्या तुलनेत आज सोनं प्रति 10 ग्रॅम 700 रुपयांनी महागलं असल्याची असल्याची माहिती आहे. ऐन लग्नसराईच्या काळात सोन्याचे भाव वाढल्यामुळे लोकं काहीसे चिंतेत आहेत.
मनी कंट्रोलच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 77,200 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,600 रुपये इतका आहे. गेल्या आठवडाभरात सोन्याचा भाव 3600 रुपयांनी घसरला होता, मात्र आता सोन्याचा भाव वाढू लागला आहे.
तर एक किलो चांदीचा दर 91,600 रुपये आहे. कालच्या तुलनेत आज त्यात सुमारे 1000 रुपयांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. सोमवारी चांदीचा भाव 1,500 रुपयांनी वाढून 93,500 रुपये किलो झाला होता.