गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सोने चांदीमध्ये गुंतवणूक करणे देखील डोकेदुखीचे ठरत आहे. भविष्यात देखील सोने चांदीचे भाव आणखी वाढण्याची शकयता नाकारता येत नाही. सोने आणि चांदीव्यतिरिक्त आणखी एक धातू आहे, ज्याची किंमत चांगलीच वाढत आहे. हा धातू म्हणजे प्लॅटिनम.
एका वर्षात प्लॅटिनमने तब्बल 150 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. त्यामुळेच आता गुंतवणूकदारांचा कल या धातूमध्ये गुंतवणूक करण्याकडे वाढला आहे. सोने आणि चांदी या धातूमध्ये केलीली गुंतवणूक सर्वाधिक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. परंतु आता प्लॅटिनमकडेही चांगले परतावा देणारा धातू म्हणून पाहिले जात आहे. गेल्या वर्षापासून म्हणजेच 2025 सालापासून प्लॅटिनम हा धातू चांगला परतावा देत आहे. या धातूची 2025 साली खूप किंमत वाढली. या वर्षीदेखील प्लॅटिनमची किंमत अशी वाढू शकते, असे सांगितले जात आहे.
आकडेवारीत सांगायचे झाल्यास. वर्षभरापूर्वी प्लॅटिनमचा भाव 900 ते 950 डॉलर प्रति औंस एवढा होता. आता हाच भाव 2470 डॉलर प्रति औंसपर्यंत वाढला आहे. म्हणजेच प्लॅटिनमने गुंतवणूकदारांना 150 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. याच वर्षभराच्या कालावधीत सोने आणि चांदीच्या किमतीत साधारण 50 टक्क्यांनी वाढ झालेली पाहायला मिळाली.