लग्नाचं बजेट कोलमडलं! सोने बाजारात मोठी उलथापालथ; आजची १० ग्रॅमची किंमत पाहून धक्काच बसेल
लग्नाचं बजेट कोलमडलं! सोने बाजारात मोठी उलथापालथ; आजची १० ग्रॅमची किंमत पाहून धक्काच बसेल
img
वैष्णवी सांगळे
सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. अशातच आज २१ जानेवारी २०२६ रोजी, बुधवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोन्याच्या दरात ऐतिहासिक वाढ झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि लग्नसराईच्या वाढत्या मागणीमुळे सोने-चांदीच्या दराने सर्वसामान्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. 

आज सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅममागे तब्बल ५ हजार २० रुपयांची ऐतिहासिक वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरानेही ५००० रुपयांची मोठी उडी घेतली आहे. या दरवाढीमुळे सराफा बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली आहे.

२४ कॅरेट सोन्याचे दर - आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ५ हजार २० रुपयांनी वाढले आहेत. आज १ तोळा सोने १,५४,८०० रुपयांना विकले जात आहे. ८ ग्रॅममागे सोनं ४,०१६ रुपयांनी वाढले असून हे दर १,२३,८४० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे तर ५०,२०० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर १५,४८,००० रुपये झाले आहेत.

२२  कॅरेट सोन्याचे दर - २२ कॅरेट सोन्याचे दर ४,६०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,४१,९०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ३,६८० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर १,१३,५२० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ४६,००० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर १४,१९,००० रुपये झाले आहेत.

१८  कॅरेट सोन्याचे दर - १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ३,७७० रुपयांची वाढ झाली आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ३०१६ रुपयांनी वाढ झाली असून ९२,८८८ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ३७,७०० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर ११,६१,१०० रुपये झाले आहेत.

आजचा चांदीचा दर किती?
केवळ सोनेच नाही, तर चांदीनेही आज ग्राहकांना जोराचा झटका दिला आहे. औद्योगिक मागणी आणि जागतिक बाजारातील चांदीचा तुटवडा यामुळे चांदीच्या दरातही प्रति किलो 5000 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. चांदीचा भाव आता नवीन उच्चांकी पातळीवर पोहोचला असून, येणाऱ्या काळात तो आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या वाढीमुळे चांदीचा दर 3,25,000 रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group