गेल्या काही काळापासून सोन्या-चांदीच्या दरांत सातत्याने चढ-उतार सुरू होते. एप्रिलअखेर सोन्याच्या दरांत मोठी वाढ होऊन 1 लाखांचा टप्पा ओलांडला होता. परंतु, त्यानंतर 7 हजार रुपयांपर्यंत सोन्याचे दर घसरले होते. दरम्यान, आता सराफा बाजारातून मोठी बातमी आहे. सोन्याच्या दरांत पुन्हा घट झाली असून चांदीला मात्र झळाळी आली आहे.
नाशिक सराफा बाजारात आज सोनं स्वस्त झालं आहे. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याच्या दरांत 200 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे आज सोन्याचे दर 96 हजार 500 रुपयांवर असणार आहेत. तर 22 कॅरेटसाठी 88 हजार 348 रुपये असणार आहे. तर ग्राहकांना 24 कॅरेट 10 ग्रॅम सोनं मोडल्यास 93 हजार 605 रुपये मिळतील.
सोन्यासोबतच चांदीच्या दरांत देखील सतत चढउतार होत आहेत. आज चांदी महागली असून नाशिक सराफा बाजारत 600 रुपये जादा मोजावे लागणार आहेत. आज प्रतिकिलो चांदीचा दर 96 हजार 600 रुपयांवर आहे.