जगभरातील तणावाच्या परिस्थितीमुळे मागच्या ६ दिवसांच्या सोनं-चांदीच्या तेजीला आज ब्रेक लागला. आंतरराष्ट्रीय बाजारात गुरुवारी सोनं आणि चांदीच्या किंमती विक्रमी उच्चांकावरून घसरल्या. ग्रीनलँडवरील भू-राजकीय तणाव कमी होत असल्याची चिन्हे दिसू लागल्याने अमेरिकन डॉलर मजबूत झाला आणि सोनं-चांदीचे भाव उतरले.
आज आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा भाव 0.8% नी घसरून प्रति औंस 4,799.79 डॉलर इतकी झाला आहे. मागील सत्रात सोन्याने प्रति औंस 4,887.82 डॉलरचा विक्रमी उच्चांक गाठला होता.जगभरातील या घटनांचा परिणाम भारतातही दिसून आला.सोनं-चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे आज सोनं-चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. १० तोळा सोन्याचे दर २२,९०० रुपयांनी स्वस्त झाले. तर १ ग्रॅम चांदीचे दर ५ रुपयांनी कमी झाले आहेत.
गुड रिटन्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात २,२९० रुपयांनी घसरण झाली आहे. २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,५४,३१० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात तब्बल २२,९०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १५,४३,१०० रुपये खर्च करावे लागणार आहे.
आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये २,१०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,४१,४५० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २२ कॅरेटचे १० तोळा सोनं २१,००० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १४,१४,५०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. त्यामुळे आज २४ आणि २२ कॅरेटचे सोनं खरेदी करताना तुमच्या खिशावर ताण येणार नाही.
२४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली. आज १८ कॅरेटचे १ तोळा सोनं १,७२० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,१५,७३० रुपये खर्च करावे लागतील. तर आज १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १७,२०० रुपयांनी घसरण झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ११,५७,३०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.
दरम्यान, सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरात ५ रुपयांनी घसरण झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला ३२५ रुपये खर्च करावे लागणार आहे. तर १ किलो चांदीचे दर तब्बल ५,००० रुपयांनी स्वस्त झाले आहे. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला ३,२५,००० रुपये खर्च करावे लागणार आहे.