सोनं आणि चांदीची खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आज सराफा बाजार उघडताच चांदी आणि सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली.
बुधवारी सराफा बाजार उघडताच २४ कॅरेट सोनं प्रति तोळा १३० रूपयांनी घसरलेय. प्रति १० तोळं सोनं एक हजार रूपयांपेक्षा जास्त स्वस्त झालं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरच्या किंमतीमुळे सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे समजतेय. आज चांदी देखील स्वस्त झाली आहे.
सोने आणि चांदीच्या किंमतीत सध्या बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांमुळे सोन्याचे दर काही शहरांमध्ये स्थिर, तर काही ठिकाणी थोडे वाढलेले दिसत आहेत.
आज सराफा बाजार उघडताच 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा 99,760 रुपये इतका झाला. मंगळवारी हा भाव 99,890 रुपये होता. 22 कॅरेट सोन्याचा भाव 91,440 रुपये, तर 18 कॅरेट सोन्याचा भाव 74,820 रुपये आहे. चांदीचा भाव प्रति किलो 1,14,900 रुपये आहे.
कोणत्या शहरात किती किंमत ?
राजधानी दिल्ली :
२४ कॅरेट सोने: ₹९९,९१०
२२ कॅरेट सोने: ₹९१,५९०
१८ कॅरेट सोने: ₹७४,९४०
मुंबई, पुणे, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू :
२४ कॅरेट सोने: ₹९९,७६०
२२ कॅरेट सोने: ₹९१,४४०
१८ कॅरेट सोने: ₹७४,८२०