गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. आजदेखील सोनं चांगलंच चकाकताना पाहायला मिळालं. सणासुदीच्या काळात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला आहे.
दसरा- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोने- चांदीची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जात असते. परंतु मागील काही दिवसांपासून सुवर्ण बाजारात मोठी तेजी असल्याचे पाहण्यास मिळत आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत सोने व चांदीच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या सुवर्णनगरीत सोने-चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले असून आज एकाच दिवसात सोन्याच्या दरात तब्बल दीड हजार रुपयांनी वाढ होऊन सोन्याचा दर १ लाख २० हजार ५०० इतका विक्रमावर पोहचला आहे.
सोने आणि चांदीच्या दरात रोज वाढ होत असून नवा उच्चांक गाठला जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोन चांदी दरात मोठी वाढ होत असून अमेरिकन फेडरल बँकेचे धोरण तसेच विविध देशांकडून वाढलेली सोन्याची खरेदी यामुळे सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हे भाव यापुढेही असेच वाढत राहणार असल्याचे सांगितले जात आहेत.
दरम्यान मागील २४ तासात सोन्याचा दर तब्बल १५०० रुपयांनी वाढला असून १ लाख २० हजार ५०० रुपयांवर दर पोहचला आहे. यामुळे जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याचा विक्रमी दर झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. यापुढे देखील सोन्याचा दर सतत वाढणार असल्याच्या प्रतिक्रिया सुवर्ण व्यवसायिक देत आहेत.