ग्राहकांची चिंता वाढली ; सोन्याच्या भावात पुन्हा विक्रमी वाढ ; पाहा तुमच्या शहरातील आजचा दर
ग्राहकांची चिंता वाढली ; सोन्याच्या भावात पुन्हा विक्रमी वाढ ; पाहा तुमच्या शहरातील आजचा दर
img
Dipali Ghadwaje
सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असल्याने बाजारातून मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जातेय. सोन्याच्या किमती पाहता ग्राहक मात्र चिंतेत आहेत. अशातच आजच्या दिवशी देखील सोन्याचा भाव वाढला आहे.  

Good returns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज ३ एप्रिल रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 540 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 9,35,300 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,575 रुपयांना मिळेल.
  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 68,600 मिळेल.
  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 85,750 एवढा आहे.
  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,57,500 रुपये इतका असल्याची माहिती आहे. 

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 9,35,300 रुपये किंमतीने विकतंय.
  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 93,530 रुपये इतका आहे.
  • ८ ग्रॅम सोनं आज 74,824 रुपये इतका आहे.
  • १ ग्रॅम सोनं 9,353 रुपयांनी विकलं जात आहे.

नाशिक : 

  • 22 कॅरेट सोनं - 8,563 रुपये
  • 24 कॅरेट सोनं - 9,341 रुपये
इतर बातम्या
Join Whatsapp Group