दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसत असून सणासुदीच्या काळात ग्राहकांची खरेदी वाढल्याने देशांतर्गत बाजारात मौल्यवान धातूंच्या मागणीने विक्रमी पातळी गाठली आहे. त्याचवेळी, अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीच्या काही आठवड्यांपूर्वी सुरक्षित गुंतवणुकीच्या मागणीमुळे कमोडिटी मार्केट आणि देशांतर्गत आघाडीवर सोन्याचे भाव विक्रमी पातळीवर झेप घेतली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आजदेखील (24 ऑक्टोबर 2024, गुरुवार) सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. या वाढीसह 24 कॅटेरच्या सोन्याचा भाव थेट 80 हजाराच्या पुढे गेला आहे. आज एका दिवशी 24 कॅरेटचं सोन 450 रुपयांनी महागलं आहे. या भाववाढीसह 24 कॅरेट सोन्याचा दर 8025.3 रुपये प्रति ग्रॅम तर 22 कॅरेट सोन्याचा दर 7358.3 रुपये प्रति ग्रॅम झाला आहे. चांदीचा सध्याचा भाव 107200.0 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
जाणून घ्या प्रमुख शहरांमधील ओने आणि चांदीचा आजचा भाव
दिल्लीमध्ये सोन्याचा भाव 80253.0 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.
दिल्लीमध्ये चांदीचा दर 107200.0 रुपये प्रति एक किलोवर पोहोचला आहे.
मुंबईत आज सोन्याचा दर 80107.0 रुपये प्रति 10 ग्रॅम वर पोहोचला आहे.
मुंबईत चांदीच्या भावातही वाढ झाली आहे. आज चांदीचा भाव 106500.0 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.