दिवाळीनिमित्त सोनं , चांदी किंवा वाहन खरेदीसाठी मोठी गर्दी असते. पण सोने आणि चांदी यांच्या वाढत्या दरामुळे ग्राहकांना सोनं खरेदी करावं का ? हा प्रश्न होता. आज धनत्रयोदशी निमित्त सोनेखरेदीसाठी मोठी गर्दी असते अशातच आता सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात घट झाल्यामुळे आज सराफांच्या दुकानात ग्राहकांची सोनं खरेदीसाठी नक्कीच गर्दी पाहायला मिळेल. सोन्याच्या भावात घट झाल्यामुळे सामान्यांना आज सोनं खरेदी करताना नक्कीच दिलासा मिळणार आहे.

आज १८ ऑक्टोबर २०२५ सोन्याच्या दरात इतकी घट
२४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १,९१० रूपयांची घट झाली आहे. २४ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी १,३०,८६० रूपये मोजावे लागतील. तर, २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात १९,१०० रूपयांची घट झाली आहे. २४ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी १३,०८,६०० रूपये मोजावे लागतील.
२४ कॅरेटसह २२ कॅरेट सोन्याच्या दरातही घट झाली आहे. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १,७५० रूपयांची घट झाली आहे. २२ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी १,१९,९५० रूपये मोजावे लागतील. तर, २२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात १७,५०० रूपयांची घट झाली आहे. २२ कॅरेट १० तोळं खरेदीसाठी ११,९९,५०० रूपये मोजावे लागतील.
१८ कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १,४४० रूपयांची घट झाली आहे. १८ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९८,१४० रूपये मोजावे लागतील. तर, १८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात १४,४०० रूपयांची घसरण झाली आहे. १८ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९,८१,४०० रूपये मोजावे लागतील.
चांदीच्या दरातही घसरण
फक्त सोनं नाही तर, चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदीच्या दरात १ ग्रॅममागे १३ रूपयांची घसरण झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी १७२ रूपये मोजावे लागतील. तर, १ किलो चांदीच्या दरात १३,००० रूपयांची घसरण झाली आहे. १ किलो चांदी खरेदीसाठी आपल्याला १,७२,००० रूपये मोजावे लागतील.