सोन्याबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत , १ फेब्रुवारीपासून सोनं महाग होणार? काय आहे कारण जाणून घ्या...
सोन्याबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत , १ फेब्रुवारीपासून सोनं महाग होणार? काय आहे कारण जाणून घ्या...
img
DB
अर्थसंकल्प सादर होण्यासाठी आता अवघे ४ दिवस शिल्लक राहिले आहेत.  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण येत्या १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

या अर्थसंकल्पामध्ये काय स्वस्त होणार? काय महाग होणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. अर्थसंकल्पामध्ये सोन्याच्या किमतीवरील कराबाबत मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

बजेटमध्ये सरकार सोन्यावरील कस्टम ड्युटी वाढवू शकते. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार असून ते ४ एप्रिलपर्यंत चालणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला म्हणजेच शनिवारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पामध्ये सरकार सोन्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकते.

सरकार सोन्यावरील आयात शुल्क म्हणे कस्टम ड्युटी वाढवण्याच्या तयारीत आहे. जर १ फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सोन्यावरील कस्टम ड्युटी वाढवण्याची घोषणा झाली तर सोन्याची आयात महाग होईल. त्यामुळे सोन्याचा भाव देखील आणखी वाढू शकतो.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group