काय सांगता! 4 दिवस काम अन् 3 दिवस सुट्टी ; मोदी सरकार करणार नवा धमाका? जाणून घ्या नेमकी काय बातमी
काय सांगता! 4 दिवस काम अन् 3 दिवस सुट्टी ; मोदी सरकार करणार नवा धमाका? जाणून घ्या नेमकी काय बातमी
img
Dipali Ghadwaje
नवी दिल्ली : आगामी अर्थसंकल्पात काय असणार याची सर्वांना उत्सुकता लागली असताना केंद्र सरकार देशात नवीन लेबर कोड जाहीर करण्याची शक्यता आहे. या नव्या कामगार संहिता नियमात आठवड्याचे कामाचे दिवस ४ करण्याचा प्रस्ताव असू शकतो. याबाबत आता एक महत्वाची बातमी समोर आली आहे. 

गेल्या काही दिवसात सर्वाधिक चर्चा झालेला विषय कोणता असेल तर तो म्हणजे कामाचे तास होय. लार्सन अॅण्ड टूब्रोचे चेअरमन एस एन सुब्रह्मण्यन यांनी आठवड्याला 90 तास काम करण्याचा सल्ला दिला. त्याआधी इन्फोसिसचे सह-संस्थापक नायराण मूर्ती यांनी देखील 70 तास काम करण्याबद्दल बोलले होते.

आठवड्याला कामाचे तास किती हवेत यावरून सर्वजण चर्चा करू लागले आहेत. येत्या 1 फेब्रुवारी रोजी बजेट सादर होणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात अनेक नव्या घोषणा आणि योजना केल्या जातील. यात कामाच्या तासासंदर्भातील एक मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कामाचे तास किती असावेत यावर फक्त भारतात नाही तर अन्य देशात देखील चर्चा होत असते. नारायणमूर्ती यांच्या मते युवकांनी दररोज 12 तास काम केले पाहिजे. तर सुब्रह्मण्यन यांनी रविवारी सुट्टी न घेता काम केले पाहिजे असा सल्ला दिला. यावरून दोघांवर सोशल मीडियावर टीका होत होती.

या सर्व पार्श्वभूमीवर भारतात आठवड्यातील 4 दिवस कामाच्या वेळापत्रकावर चर्चा सुरू झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आगामी अर्थसंकल्पात टप्प्याटप्प्याने कामगार संहिता लागू करण्याची योजना जाहीर करू शकतात.

आगामी अर्थसंकल्पात मोदी सरकार नवीन कामगार संहिता नियम लागू करण्याची घोषणा करेल, असा विश्वास अनेकांना आहे.  
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group