हृदय पिळवटून टाकणारी घटना!  शेकडो गाड्या अंगावरुन जात राहिल्या; पोस्टमार्टमही शक्य नाही
हृदय पिळवटून टाकणारी घटना! शेकडो गाड्या अंगावरुन जात राहिल्या; पोस्टमार्टमही शक्य नाही
img
Dipali Ghadwaje

गाजियाबादमध्ये अपघाताची एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. रस्ते अपघात एका मृतदेहावरुन शेकडो गाड्या गेल्याची घटना घडलीये. या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, वेव सिटी भागात धुक्यांमुळे एनएन-९ वर एका वाहनाचा अपघात झाला होता. त्यानंतर मृतदेहावरुन शेकडो गाड्या जात राहिल्या. धुके हटल्यानंतर सकाळी जवळपास १० वाजता लोकांना रस्त्यावर रक्त दिसले.

त्यामुळे त्यांनी यासंदर्भातील माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या गाजियाबादमध्ये राष्ट्रीय महामार्ग ९ वरती एका व्यक्तीचा अपघात झाला. या वक्तीचे छिन्नविछिन्न झालेले अवयव आढळून आले आहेत.

मंगळवारी सकाळी धुके कमी झाल्यानंतर मृत व्यक्तीबाबत माहिती मिळाली होती. रस्त्यावरील वाहने अंगावर जात राहिल्याने व्यक्तीच्या शरीराचे पूर्ण तुकडे झाल्याचे आढळून आले.

गाजियाबाद-हापुड हायवेवर वेव सिटी पोलीस स्टेशन हद्दीत सद्भावना चौकाजवळ हा अपघात घडला. पोलिसांनी मृतदेहाचे काही तुकडे गोळा केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरुन डोक्याचे काही केस, एक बोट आणि कानाचा एक तुकडा मिळाला आहे. सदर घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

तर या अपघातात  मृत व्यक्ती कोण आहे हे अद्याप  कळू शकलेलं नाही. पोलीस या अपघाताप्रकरणी आजूबाजूच्या भागात विचारणा करत आहेत. परिसरातील इतर पोलीस स्टेशनला देखील माहिती देण्यात आली आहे. मृतदेह पोस्टमार्टम होण्याच्या देखील स्थितीमध्ये नाहीये. व्यक्ती बेपत्ता असल्याची एफआयर कोणी दाखल केली तर याबाबत कळू शकेल.  या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

इतर बातम्या
Join Whatsapp Group