पहिली नोकरी मिळाल्यास 15 हजार तर दिवाळीतही मोठी भेट ; पं. नरेंद्र मोदींच्या भाषणातील ५ मोठे मुद्दे
पहिली नोकरी मिळाल्यास 15 हजार तर दिवाळीतही मोठी भेट ; पं. नरेंद्र मोदींच्या भाषणातील ५ मोठे मुद्दे
img
वैष्णवी सांगळे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आज लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. यावेळी लाल किल्ल्यावरुन नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी पाकिस्तान आणि अमेरिकेला इशारा देखील नरेंद्र मोदी यांनी दिला. नरेंद्र मोदींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे कोणते होते, जाणून घ्या...

१) तरुणांसाठी मोठी घोषणा -  आज, 15 ऑगस्ट रोजी, आम्ही पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेअंतर्गत देशातील तरुणांसाठी 1 लाख कोटी रुपयांच्या योजना राबवत आहोत. खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्यांना 15,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

२) दिवाळीत मोठी भेट देणार - या दिवाळीत एक मोठी भेट मिळणार आहे. आम्ही सलग 8 वर्षे जीएसटी कमी करण्यासाठी काम केले आहे. आम्ही पुढच्या पिढीच्या जीएसटीवर काम करत आहोत आणि या दिवाळीत आपण खरेदी केलेल्या आणि दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तू खूप स्वस्त होतील. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी घोषणा देखील नरेंद्र मोदींनी केली. 

 ३) आम्ही मेड इन इंडिया चिप्स आणणार - आज जगभर तंत्रज्ञानाबद्दल चर्चा आणि विकास होत आहे. चार-पाच दशकांपूर्वी आपल्या देशात सेमीकंडक्टरबद्दल चर्चा होत होती, पण कोणीही लक्ष दिले नाही आणि ती कल्पना रद्द करण्यात आली. पण आम्ही हा अपराध दूर करण्यासाठी काम केले आहे आणि जमिनीवर 6 युनिट्स उभारत आहोत आणि वर्षाच्या अखेरीस आम्ही मेड इन इंडिया चिप्स आणू, अशी माहिती नरेंद्र मोदींनी दिली. 

४) अण्वस्त्रांच्या धमक्यांना भीक घालत नाही - आज आपल्याला लाल किल्ल्यावरून ऑपरेशन सिंदूरच्या शूर सैनिकांना सलाम करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या शूर सैनिकांनी शत्रूंना त्यांच्या कल्पनेपलीकडे शिक्षा दिली आहे. अण्वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही आता भीक घालत नाही, असा इशारा देखील नरेंद्र मोदींनी दिला. 

५) सुदर्शन चक्र मिशनची घोषणा - नरेंद्र मोदींनी देशाच्या सुरक्षेबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सुदर्शन चक्र मिशनची घोषणा केली आहे. ही एक शक्तिशाली शस्त्र प्रणाली असेल, ती केवळ शत्रूच्या हल्ल्याला निष्प्रभ करेलच असे नाही तर अनेक पटींनी प्रत्युत्तर देखील देईल, असे नरेंद्र मोदींनी सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group