पहलगामनंतर मोठी कारवाई ;
पहलगामनंतर मोठी कारवाई ; "त्या" दोन दहशतवाद्यांचं घर जमीनदोस्त
img
Dipali Ghadwaje
 पहलगाममध्ये भ्याड हल्ला करून 26 पर्यटकांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांना जमिनीत गाडण्याची वेळ आली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यानंतर आता या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या दोन दहशतवाद्याचे घर जमीनदोस्त करण्यात आल्याचे समोर आले आहे. वृत्तानुसार महोम्मतराल येथील आसिफ शेख याचे घर पाडण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

पहलगाम दहशतवादी  हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी केलेली मोठी कारवाई समोर आली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते.

यानंतर सुरक्षा यंत्रणांनी मोठी मोहीम सुरू केली आहे. जम्मू-काश्मीर पोलिस त्रालमधील दहशतवादी आसिफच्या घरी पोहोचले होते. त्यावेळी त्याच्या घरात स्फोटकांचा साठा होता, ज्यामुळे हा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर पोलिसांनी बुलडोझर वापरून दहशतवादी आदिलच्या घरावर कारवाई केली ते घर जमीनदोस्त केले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये दहशवादी सुरक्षा दलांना आव्हान देताना दिसत होते.

आसिफ शेख आणि आदिल हे दोघेही पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील आरोपी आहेत. दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आहेत. २२ एप्रिल रोजी बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित व्हिडिओमध्ये हे दोघेही दिसत होते. या भयानक हल्ल्यानंतर दोघेही फरार आहेत. हल्ल्यात सहभागी असलेल्या आसिफ आणि आदिलसह इतर दहशतवाद्यांना ठार मारण्यासाठी सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरू आहे.

नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानचा गोळीबार

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून काड्या करणं सुरूच असून, नियंत्रण रेषेच्या काही भागात पाक सैन्याकडून गोळीबार केला जात आहे. या गोळीबाराला भारतीय सैन्यानेदेखील चोख प्रत्युत्तर दिले असून, यात एक दहशतवादी जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय लष्कराला हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

भारतीय लष्करप्रमुख श्रीनगर-उधमपूरला भेट देणार 
सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी श्रीनगर आणि उधमपूरला भेट देणार आहेत. जनरल उपेंद्र द्विवेदी सुरक्षा संस्थांच्या अधिकाऱ्यांना भेटतील आणि परिस्थितीचा आढावा घेतील. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील पहलगाममध्ये पोहोचले होते. यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सीसीएसची बैठक झाली. यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

 
 
  
इतर बातम्या
Join Whatsapp Group