पहलगाम हल्ल्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री भावुक, म्हणाली
पहलगाम हल्ल्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री भावुक, म्हणाली "एक मुसलमान आणि एक भारतीय म्हणून, मी..."
img
Dipali Ghadwaje
पहलगाम हल्ल्यानंतर  विविध स्तरांकडून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटींनी या हल्ल्याविषयी तीव्र संताप व्यक्त केलाय. अशातच अभिनेत्री हिना खानने सोशल मीडियावर पोस्ट करुन पहलगाम हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केलाय.

पहलगाम हल्ल्यानंतर मुंबईत येऊन हिना खानने लांबलचक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये हिना खानने मुस्लीम असून सर्व हिंदूंची माफी मागते, अशी पोस्ट लिहून तिचं मत व्यक्त केलंय.

हिना खानने पोस्ट करुन लिहिलंय की, "सर्वांसाठी संवेदना, एक काळा दिवस. जर आपण सत्य स्वीकारण्यात अपयशी ठरलो तर काहीच अर्थ उरत नाही. विशेष म्हणजे जर आपण मुस्लिम असल्याने घडलेल्या गोष्टी नाकारत राहिलो, तर फक्त सोशल मीडियावरील काही ट्वीट्स एवढंच आपलं अस्तित्व उरेल.

जे काही दहशतवाद्यांनी केलं, आणि हे दहशतवादी स्वतःला मुसलमान म्हणवत अमानवीय, निर्दयी आणि माणुसकीला काळिमा फासणारं कृत्य करतात. कल्पना करा, एखाद्या मुस्लिमाला बंदुकीच्या धाकावर आपला धर्म सोडायला लावून, मग त्याचा खून केला गेला असता तर... हे विचार करूनच अंगावर काटा येतो.”

“एक मुसलमान आणि एक भारतीय म्हणून, मी माझ्या सर्व हिंदू बांधवांची माफी मागते. ही घटना खूप वेदनादायक आहे. ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांच्यासाठी मी दुःखी आहे.पहलगाममध्ये जे काही घडलं, ते विसरणं अशक्य आहे.” अशाप्रकारे हिना खानने सोशल मीडियावर पोस्ट लिहून तिच्या भावना व्यक्त केल्यात.

याशिवाय सर्व हिंदू बांधवांची माफी मागितली आहे. याशिवाय "आम्ही सर्व भारतीय एक आहोत. आमच्यात फूट पाडू नका", असंही आवाहन हिना खानने केलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group