लालबाग राजाच्या दरबारात अभिनेत्रीशी गैरवर्तन ; Video शेअर करत व्यक्त केला संताप
लालबाग राजाच्या दरबारात अभिनेत्रीशी गैरवर्तन ; Video शेअर करत व्यक्त केला संताप
img
Dipali Ghadwaje
मुंबई, पुण्यासह राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. देशभरातील गणेश भक्तांसह सिनेसृष्टीतील कलाकार, राजकीय नेते मंडळी मुंबईमधील लालबागच्या राजाच्या दर्शनाला गर्दी करत आहेत. पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात. लालबागचा राजा नवसाला पावतो असं म्हणतात त्यामुळे त्याच्यावर भाविकांची विशेष श्रद्धा. राजाचे चरण स्पर्श करण्यासाठी सगळे आतुरलेले असतात. 

दरम्यान हिंदी टेलिव्हिजनवरील कुमकुम भाग्य तसेच पांड्या स्टोर मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री सिमरन बुधरुप लालबागच्या राजाच्या दर्शनाला आली असता सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. अभिनेत्रीने स्वतः इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला आहे.

लालबागच्या राजाच्या दरबारात सामान्य लोकांची रांगा वेळी आणि VVIP लोकांचा वेगळा थाट पाहायला मिळतो. तसंच इथल्या महिला सुरक्षारक्षकांचीही मनमानी असते.अभिनेत्री सिमरन बुधरुप  काल तिच्या आईसोबत लालबागचा राजाच्या दर्शनासाठी गेली होती. मात्र तिथे दोघींसोबत गैरवर्तन झालं. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत तिने संताप व्यक्त केला आहे. सिमरन गर्दीत उभी राहून आईचा फोटो काढत होती. 

यावेळी महिला सुरक्षारक्षक तिथे आल्या आणि त्यांनी तिच्या आईच्या हातातून मोबाईलच हिसकावून घेतला. सिमरन मध्ये पडली तर तिच्यासोबतही गैरवर्तन केलं. सिमरन याचा व्हिडिओ घेत होती तर तिचाही फोन घेतला. 'असं करु नका, काय करताय तुम्ही? अशा भाषेत ती ओरडतानाही दिसत आहे. महिला सुरक्षारक्षकांच्या या मनमानीवर तिने संताप व्यक्त केला आहे.


सिमरनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. चाहत्यांनीही यावर कमेंट करत निषेध व्यक्त केला आहे. दरवर्षी लालबागचा राजाच्या दर्शनावेळी हे प्रकार पाहायला मिळतात. हजारो भाविकांची गर्दी असते आणि दुसरीकडे VVIP ना वेळच वेळ दिला जातो. लोकांनी मंडळावरही संताप व्यक्त केला आहे. पण दरवर्षी पुन्हा तेच चित्र पाहायला मिळतं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group