दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीसह बॉलिवूड गाजवणारी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या अफेअरची चांगलीच चर्चा आहे. विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदाना हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीचे स्टार आहेत. दोन दिवसांपासून विजय आणि रश्मिकाचा साखरपुडा होणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. आता अभिनेत्याच्या टीमने यासंदर्भात खुलासा करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा त्यांच्या सिनेमांसह वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतात. रश्मिका आणि विजय सध्या साखरपुड्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. त्यांच्या साखरपुड्याची आणि लग्नाची चाहत्यांनाही उत्सुकता आहे. मात्र या लग्नाबाबत रश्मिका आणि विजयच्या चाहत्यांना नाराज करणारी एक अपडेट येतेय.
रश्मिका-विजयचा खरचं साखरपुडा होणार?
रश्मिका आणि विजयने अद्याप त्यांचं रिलेशन जगजाहीर केलेलं नाही. आता विजयच्या टीमने साखरपुड्याच्या बातम्या समोर आल्यानंतर याबद्दल मौन सोडलं आहे. आयएएनएसच्या रिपोर्टनुसार, दोन्ही कलाकारांच्या टीमने सारखपुड्याच्या बातम्यांमध्ये काही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. या रिपोर्टनुसार, दोघे डेट करीत असले तरी त्यांनी त्यांचे नाते सार्वजनिक केलेले नाही.
विजय आणि रश्मिकाने 'गीता गोविंदम' आणि 'डियर कॉम्रेड' या चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. 'गीता गोविंदम' या सिनेमाच्या निमित्ताने त्यांनी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली होती. त्यांची ऑन स्क्रीन जोडी चाहत्यांच्याही पसंतीस उतरली होती. दोघांना एकत्र वेळ घालवतानाही अनेकदा स्पॉट करण्यात आले आहे. त्यांच्या डेटिंग आणि लग्नाबाबतच्या चर्चा सतत होत असल्या तरी त्यांच्या लग्नाच्या बातमीसाठी मात्र चाहत्यांना अजून वाट बघावी लागणार आहे.
रश्मिका-विजयच्या आगामी चित्रपट
रश्मिकाचा 'ॲनिमल' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' या सिनेमातही ती दिसणार आहे. तसेच रेनबो, द गर्लफ्रेंड आणि चावा हे तिचे आगामी सिनेमे आहेत. दुसरीकडे विजयचे 'फॅमिली स्टार' 'वीडी 12' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. तसेच त्यांच्या आगामी सिनेमांसह लग्नसोहळ्याचीदेखील चाहत्यांना उत्सुकता आहे.