
मुंबई :- प्रसिद्ध अभिनेता मुकुल देवचे आकस्मिक निधन झाल्याने बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. मृत्यूसमयी ते ५४ वर्षांचे होते.
काही दिवसांपासून मुकुल यांची प्रकृती ठीक नसल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, काल रात्री उपचारादरम्यान मुकुल यांची प्राणज्योत मालवली. अभिनेते विंदू दारा सिंग यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. १९९६ मध्ये 'मुमकिन' या दूरचित्रवाणी मालिकेने मुकुल देव यांनी त्यांच्या करिअरला सुरुवात केली होती.
चित्रपट जगतातील एवढ्या प्रसिद्ध चेहऱ्याने अचानक जगाचा निरोप घेतल्याने बॉलिवूडसह अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, देव यांच्या निधनाच्या बातमीनंतर इंडस्ट्रीतील अनेक स्टार्सनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत.
प्रसिद्ध अभिनेत्री दीपशिखा नागपालने तिच्या अधिकृत सोशल मीडियावर मुकुल देव यांच्यासोबतची एक स्टोरी शेअर करताना लिहिले आहे की, मुकुल देव आता या जगात नाही यावर माझा विश्वासच बसत नाही.