तमिळ चित्रपट दिग्दर्शक भारतीराजा यांचा मुलगा अभिनेता मनोज भारतीराजा यांचे दुःखद निधन झाले आहे. यांनी मंगळवारी ( 25 मार्च) ला अखेरचा श्वास घेतला. चेन्नईमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने यांचे निधन झाले. मीडिया रिपोर्टनुसार, मनोज भारतीराजा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
मनोज यांची काही दिवसापूर्वी बायपास सर्जरी झाल्याची बातमी समोर आली होती. शेवटी त्यांनी वयाच्या 48 वर्षी अखेरचा श्वास घेतला. मनोज भारतीराजा यांच्या कुटुंबात पत्नी अश्वथी उर्फ नंदना आणि दोन मुली आहेत. ज्यांची नावे अर्शिता आणि मथिवथानी आहेत.
मनोज भारतीराजा यांनी आजवर अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. चाहते त्यांच्या अभिनयाचे दिवाने आहेत. मनोज भारतीराजा यांनी 'ताजमहल' या तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांच्या वडिलांनी म्हणजे भारतीराजा यांनी केले होते.
त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मनोज भारतीराजा अलिकडेच 'स्नेक्स अँड लॅडर्स' या सीरिजमध्ये पाहायला मिळाले. मनोज भारतीराजा यांनी अभिनयासोबतच चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे.
मनोज यांनी 'ताजमहल' चित्रपटातील ए.आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं 'इची एलुमिची' हे गाणे गायले आहे. त्यांची कारकीर्द खूप मोठी आणि उल्लेखनीय आहे. मनोज भारतीराजा यांच्या अचानक निधनानंतर सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला.