सनी देओलच्या 'जाट' चित्रपटाविरोधात एफआयआर दाखल
सनी देओलच्या 'जाट' चित्रपटाविरोधात एफआयआर दाखल
img
दैनिक भ्रमर
बॉलिवूड  अभिनेता सनी देओलच्या 'जाट' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असून, पहिल्या आठवड्यात 61 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. परंतु आता हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.  दरम्यान ,  'जाट' या चित्रपटावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला असून, पंजाबच्या जालंधरमध्ये अभिनेता आणि चित्रपटाच्या टीमविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. चित्रपटातील एका दृश्यामुळे ख्रिश्चन समुदायाने या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे.​

या प्रकरणात सनी देओल, रणदीप हुड्डा, विनीत कुमार सिंह, दिग्दर्शक गोपीचंद आणि निर्माता नवीन यांच्यावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस)च्या कलम 299 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जालंधरच्या फोलडीवाल गावातील रहिवासी विकल्प गोल्ड यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.​

विवादित दृश्यात रणदीप हुड्डा, जो या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत आहेत तो चर्चच्या पवित्र वेदीसमोर उभे आहे आणि अन्य सभासद प्रार्थना करत असताना चर्चच्या आत गुंडगिरी आणि धमकीचे प्रसंग दाखवण्यात आले आहेत, त्यामुळे ख्रिश्चन समुदायाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या दृश्याचा एक भाग चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही दिसतो.​
इतर बातम्या
Join Whatsapp Group