प्रजासत्ताक दिनाच्या काही दिवस आधी रीलिज झालेला देशभक्तीपर सिनेमा Border 2 सध्या बॉक्स ऑफिसवर अधिराज्य करतो आहे. सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘बॉर्डर 2’ची बॉक्स ऑफिसवर धुआंधार कमाई सुरू आहे. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात दणक्यात कमाई केली.
23 जानेवारी 2026 रोजी रीलिज झालेला हा चित्रपट 25 जानेवारीपर्यंत 100 कोटी क्लबमध्ये पोहोचला असून जगभरात ही कमाई 150 कोटींचा पार गेली. एवढेच नव्हे तर तिसऱ्या दिवशी झालेल्या कमाईनंतर या चित्रपटाने 'गदर 2', 'केजीएफ 2', 'दंगल', 'आरआरआर', 'बाहुबली 2'चा रेकॉर्ड मोडला. तर अवघ्या ३ दिवसांत ‘बॉर्डर २' ने ५ तगडे रेकॉर्ड्स बनवले आहे.
१) ‘बॉर्डर 2’ हा चित्रपट अवघ्या तीन दिवसांत सनी देओलच्या करिअरमधील दुसरा सर्वांत मोठा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने ‘जाट’ (90.34 कोटी रुपये) आणि ‘गदर: एक प्रेम कथा’ (76.88 कोटी रुपये) यांच्याही कलेक्शनला मागे टाकलं आहे.
२) ‘बॉर्डर 2’ने 2025 मधल्या 8 चित्रपटांच्या ओपनिंग वीकेंड कलेक्शनला मात दिली आहे. यामध्ये ‘धुरंधर’ (106.5 कोटी रुपये), ‘थामा’ (103.5 कोटी रुपये), ‘हाऊसफुल 5’ (91.83 कोटी रुपये), ‘सिकंदर’ (86.44 कोटी रुपये) आणि ‘सैयारा’ (84.45 कोटी रुपये) यांचा समावेश आहे.
३) ‘बॉर्डर 2’ने तीन दिवसांत वरुण धवनच्या सहा बॉलिवूड चित्रपटांना कमाईच्या बाबतीत मागे टाकलं आहे. यामध्ये हम्प्टी शर्मा की दुल्हनिया, सुई धागा, जुगजुग जियो, कलंक, एबीसीडी 2 आणि बद्रीनाथ की दुल्हनियाँ यांचा समावेश आहे. यासोबतच ‘बॉर्डर 2’ हा वरुणच्या करिअरमधील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
४) ‘बॉर्डर 2’ने 6 ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या तिसऱ्या दिवसाच्या रेकॉर्डलाही धूळ चारली आहे. यामध्ये ‘दंगल’ (42.41 कोटी रुपये), ‘बाहुबली 2’ (46.5 कोटी रुपये), ‘धुरंधर’ (43 कोटी रुपये), RRR (31.5 कोटी रुपये), ‘केजीएफ 2’ (42.9 कोटी रुपये) आणि ‘गदर 2’ (51.7 कोटी रुपये) यांचा समावेश आहे.
५० ‘बॉर्डर 2’ हा ओपनिंग वीकेंडला सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूडमधील 18 वा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने आमिर खानच्या ‘दंगल’सह इतर अनेक चित्रपटांना मागे टाकलं आहे.