धुरंधरपेक्षाही जास्त चर्चा सध्या सनी देओलच्या चित्रपटाची आहे. सनी देओल पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे. कारण “बॉर्डर २ ” चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर 29 वर्षांनी त्याचा सिक्वेल Border 2 आता थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. रिलीज होण्यापूर्वीच या चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली असून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालातान दिसत आहे.
सॅकनिल्कच्या रिपोर्ट्सनुसार, बॉर्डर २ ” या चित्रपटाने भारतात 16 हजार 221 शोसाठी एकूण 4, 09, 117 तिकिटे विकली आहेत. या चित्रपटाने फक्त ॲडव्हान्स बुकिंगमधून तब्बल 12 .5 कोटी कमावले आहेत. जर ब्लॉक केलेल्या जागांचाही समावेश केला तर, ॲडव्हान्स बुकिंगमधून चित्रपटाने आधीच 17.50 कोटी कमावले आहेत. ओपनिंग डेच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
ॲडव्हान्स बुकिंगमध्ये या चित्रपटाने धुरंधरलाही मागे टाकलं आहे. ॲडव्हान्स बुकिंगद्वारे धुरंधरने 14 कोटी रुपये कमावले, तर बॉर्डर 2 ने 17 कोटी रुपयांचा कलेक्शनचा टप्पा ओलांडला आहे. आता या चित्रपटाला मोठी कमाई करण्याची सुवर्णसंधी आहे. हा चित्रपट ज्या दिवशी ( शुक्रवार 23 जानेवारी) प्रदर्शित होतोय, सुमारास इतर कोणतेही मोठे चित्रपट प्रदर्शित होणार नाहीयेत आणि प्रजासत्ताक दिन देखील जवळ आला आहे. त्यामुळे, या चित्रपटाला परफॉर्मन्स करण्यासाठी एक उत्तम स्टेज मिळाला आहे.