मनोरंजन क्षेत्रात सध्या सर्वत्र फक्त 'बॉर्डर 2' ची चर्चा आहे. 'बॉर्डर 2' या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड ब्रेक करत नवे रेकॉर्ड बनवले आहे. २६ जानेवारीला (प्रजासत्ताक दिन) तर चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. 'बॉर्डर 2' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 30 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 35 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 54.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'बॉर्डर 2' चित्रपटाने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाला 59 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ज्यामुळे चित्रपटाचे एकूण कलेक्शन 180 कोटी रुपये झाले.
मीडिया रिपोर्टनुसार, 'बॉर्डर 2'ने जगभरात 200 कोटींच्यावर कमाई केली आहे. चार दिवसांत 239.2 कोटी रुपये कमावले आहेत.रिपोर्टनुसार, 'बॉर्डर 2' चित्रपट पहिल्या सोमवारी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. 'बॉर्डर 2'ने रिलीजच्या पहिल्या सोमवारी विक्रमी कमाई करून इतिहास रचला. त्याने 'पुष्पा 2', 'छावा', 'धुरंधर', 'पठाण' आणि 'जवान' यांसारख्या मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे.
बॉर्डर 2- 59 कोटी रुपये
टाइगर 3- 58 कोटी रुपये
पुष्पा 2- 46.4 कोटी रुपये
बाहुबली 2- 40.25 कोटी रुपये
एनिमल- 40.06 कोटी रुपये
गदर 2- 38.7 कोटी रुपये
स्त्री 2- 38.1 कोटी रुपये
टाइगर जिंदा है-36.54 कोटी रुपये
हाउसफुल 4- 34.56 कोटी रुपये
जवान- 30.5 कोटी रुपये