बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या कियारा अडवाणीने काही दिवसांपूर्वीच तिच्या चाहत्यांसोबत एक गुड न्यूज शेअर केली आहे. लग्नाच्या दोन वर्षांनंतर सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. या बातमीमुळे बॉलिवूड विश्वात आनंद पसरला. चाहत्यांबरोबरच अनेक सेलिब्रिटींनी सिद्धार्थ आणि कियाराला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, आई होण्याआधी कियारा तिची सगळी कामं पूर्ण करण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. कियारा अडवाणीला 'वॉर २', 'टॉक्सिक' आणि 'डॉन ३' साठी साइन करण्यात आलं होतं. मात्र आता कियाराने यातील एक चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कियाराने गरोदरपणात ब्रेक घेण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.