सलमान खानच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी , घेतला 'हा' मोठा निर्णय
सलमान खानच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी , घेतला 'हा' मोठा निर्णय
img
Dipali Ghadwaje
गेल्या काही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश न मिळाल्याने, अभिनेता सलमान खान आता त्याच्या आगामी ‘बॅटल ऑफ गलवान’ या सिनेमासाठी जोरदार तयारी करत आहे. गलवान खोऱ्यातील सत्य घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटातील भूमिकेसाठी सलमानने आपल्या जीवनशैलीत मोठे बदल केले असून, तो सध्या कठोर मेहनत घेत आहे.

काय आहे प्रकरण?

आपल्या भूमिकेला पूर्ण न्याय देण्यासाठी, सलमान खानने  सर्वप्रथम दारू पिणे पूर्णपणे बंद केले आहे. ‘सिकंदर’ चित्रपटाच्या रिलीजनंतर, त्याने संपूर्ण लक्ष आपल्या फिटनेसवर केंद्रित केले असून, तो ‘फॅट टू फिट’ या प्रवासावर आहे. यासाठी सलमान जिममध्ये तासनतास घाम गाळत असून, त्याने जंक फूड खाणेही पूर्णपणे टाळले आहे. तो सध्या एका काटेकोर डाएटचे पालन करत आहे.

‘बॅटल ऑफ गलवान’ हा चित्रपट १५ जून २०२० रोजी लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षावर आधारित आहे. या झटापटीत भारतीय लष्कराचे अनेक जवान शहीद झाले होते. या चित्रपटात सलमान खान कर्नल बी. संतोष बाबू यांची भूमिका साकारणार आहे, ज्यांनी या लढाईत आपले प्राण गमावले होते.

लडाखमध्ये चित्रीकरण सुरु

या महत्त्वाकांक्षी चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व लाखिया करत असून, याचे चित्रीकरण जुलै २०२५ पासून लडाखमध्ये  सुरू होणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत चित्रांगदा सिंग , अंकुर भाटिया आणि हर्षिल शाह  हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर चित्रपटाला संगीत हिमेश रेशमिया  देणार आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group