बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन कितीही व्यस्त असले तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात आणि चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून बिग बी कायम त्यांच्या मनातील विचार मांडत असतात. पण आता अमिताभ बच्चन यांनी केलेलं ट्विट पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांच्या ट्विटची चर्चा रंगली आहे. ट्विटवर अनेक चाहते प्रतिक्रिया देत चिंता व्यक्त करत आहेत.

सांगायचं झालं तर, 82 वर्षीय अमिताभ बच्चन यांनी 7 फेूब्रुवारी 8 वाजून 34 मिनिटांनी ट्विट केलं आहे. ट्विट करत बिग बी यांनी ‘जाण्याची वेळ आली आहे…’ असं लिहिलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या ट्विटनंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
अमिताभ बच्चन यांनी ‘जाण्याची वेळ आली आहे…’ असं ट्विट केलं आहे. पण या ट्विटमागे नक्की काय रहस्य आहे, हे बिग बींनी स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे ट्विटनंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. बिग बी यांनी असं ट्विट का केलं? असा प्रश्न आता त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.
अमिताभ बच्चन यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, बिग बीच्या चाहत्यांची संख्या भारतातचं नाही तर, परदेशात देखील फार मोठी आहे. वयाच्या 82 व्या वर्षी देखील बिग बी मोठ्या पडद्यावर सक्रिय आहे. त्यांना रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आजही तितकेच उत्सुक असतात. पण आता बिग बी यांच्या ट्विटनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते चिंता व्यक्त करत आहेत.