अमिताभ बच्चन-रेखा यांच्या ब्रेकअपमागचं खरं कारण समोर; अभिनेत्रीच्या मैत्रिणीकडून मोठा खुलासा
अमिताभ बच्चन-रेखा यांच्या ब्रेकअपमागचं खरं कारण समोर; अभिनेत्रीच्या मैत्रिणीकडून मोठा खुलासा
img
वैष्णवी सांगळे
अमिताभ बच्चन आणि रेखा बॉलीवुडचं ते कपल ज्यांच्या नात्याच्या चर्चा कायमच रंगतात. पण सत्य काय यावर ते दोघेही कधीही पुढे येऊन बोलले नाही.  त्यामुळे या दोघांच्या नात्यातलं कोडं कधीच कोणाला सोडवता आलं नाही. पण आता रेखा यांची जवळचीच मैत्रीण पुढे आली आहे. तीने सत्य काय आहे हे सांगून बॉलिवूड जगतात एकच खळबळ उडवून दिली आहे. 

डिझायनर बीना रमानी हे नाव बॉलिवूडमध्ये नेहमी चर्चेत असतं. त्या अभिनेत्री रेखा यांच्या जवळच्या मैत्रीण आहेत. त्यांनी रेखा आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या कथित नात्याबद्दल अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी नुकत्याच एका मुलाखतीत उघड केल्या आहेत. रेखा यांची अत्यंत जवळची मैत्रीण बीना रमाणी त्यांच्या नात्याबद्दल बोलताना म्हणाल्या, त्यावेळी रेखाला अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली द्यावी असं वाटत होतं. आपलं नातं लपून राहू नये आणि त्याबद्दल सर्वांना कळावं, अशी तिची इच्छा होती. 

परंतु असं होऊ शकलं नाही. कारण त्यावेळी अमिताभ बच्चन हे जया बच्चन यांच्याशी विवाहित होते आणि राजकारणात सक्रिय होऊ पाहत होते. बीना रमाणी यांनी रेखा यांच्या बालपणाबद्दल आणि त्यांच्या भावनांबद्दलही मोकळेपणे सांगितलं. अभिनेते जेमिनी गणेशन यांच्या अनौरस मूल म्हणून जन्मलेल्या रेखा या स्थिर कुटुंबरचनेशिवाय वाढल्या. या गोष्टींचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाल्याचं त्यांनी सांगितलं.

बीना म्हणाल्या, "रेखा खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्या एका लहान मुलासारख्या निरागस आहेत. त्यांनी आयुष्यात काही नासमज चुका केल्या असतील, तर त्या केवळ त्यांच्या निश्पाप स्वभावा मुळे आहेत.  बीना यांच्या मते, रेखा यांना आई-वडिलांकडून खूप प्रेमाची गरज होती. जी त्यांना मिळाली नाही. केवळ 13-14 वर्षांच्या कोवळ्या वयात त्यांनी काम सुरू केले आणि त्या आपले बालपण जगू शकल्या नाहीत. असं ही त्यांनी या मुलाखतीत सांगितलं.

बीना रमानी रेखा यांना भेटल्या. तेव्हा रेखा यांचे संपूर्ण जग अमिताभ यांच्याभोवती फिरत होते. ते दोघे आत्मिकरित्या जोडले गेले होते. पण अमिताभ बच्चन राजकारणात उतरल्यानंतर हे नाते सार्वजनिकरित्या पुढे जाऊ शकले नाही. त्या कठीण काळात रेखा खूप त्रास सहन करत होत्या. "अमिताभ बच्चन राजकारणात सक्रिय झाले होते. रेखा मला भेटायला न्यूयॉर्कला आली होती. 

त्यावेळी ती कठीण काळातून जात होती. कारण अमिताभ बच्चन यांनी कदाचित तिला सांगितलं होतं की त्यांचं नातं कधीही जगजाहीर होणार नाही", असं त्या पुढे म्हणाल्या. नंतर त्यांनी मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केले, पण ते नातेही फार काळ टिकले नाही. बीना यांच्या या मुलाखतीनंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group