अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटावर अमिताभ बच्चन यांनी सोडलं मौन, म्हणाले....
अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटावर अमिताभ बच्चन यांनी सोडलं मौन, म्हणाले....
img
Dipali Ghadwaje
गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या अफवा पसरल्या होत्या. अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या बऱ्याच चर्चा सुरु आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक लवकरच घटस्फोट घेणार असल्याची माहितीही समोर आलेली आहे.

दरम्यान, या जोडप्याने किंवा बच्चन कुटुंबाने या अफवांबाबत कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. अशातच नुकतच आराध्या बच्चनचा वाढदिवस झाला. पण तिच्या वाढदिवसाला बच्चन कुटुंबियांपैकी कुणीच नव्हतं. त्यामुळे पुन्हा एकदा या चर्चांना उधाण आलं आहे.

त्यातच आता अमिताभ बच्चन यांच्या पोस्टमुळे खळबळ माजली आहे. अमिताभ बच्चन त्यांच्या सोशल मीडियावर नुकताच त्यांचा ब्लॉग शेअर केला आहे. त्यांच्या या ब्लॉगमध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टींवर भाष्य केल्याचं पाहायला मिळतंय.

एका वृत्त संस्थेच्या वृत्तानुसार, अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटावर भाष्य केलं आहे. अमिताभ यांनी गुरुवार 21 नोव्हेंबर रोजी हा ब्लॉग शेअर केला आहे. 


अमिताभ बच्चनयांनी ब्लॉगमध्ये काय म्हटलं?

अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये म्हटलं की, 'वेगळं होण्यासाठी आणि जीवनात त्यावर विसंबून राहण्यासाठी दृढ विश्वास, खूप धैर्य, प्रामाणिकपणा आवश्यक आहे..' अमिताभ बच्चन यांची ही पोस्ट आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ज्यावर चाहतेही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये पुढे लिहिलं की, 'मी कुटुंबाबद्दल कमी बोलतो कारण ती  माझी प्रायव्हसी आहे. अफवा या फक्त अफवा आहे.  या खोट्या अफवा आहेत, ज्याची पुष्टी झालेली नाही. कुठे, काय लिहिलंय आणि कसं रिपोर्ट केलं जातंय, याची आधी खातरजमा झाली पाहिजे. 

 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group