किन्नर आखाड्याची मोठी कारवाई : ममता कुलकर्णीची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी , घेतला
किन्नर आखाड्याची मोठी कारवाई : ममता कुलकर्णीची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी , घेतला
img
Dipali Ghadwaje
मुंबई : 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी 25 वर्षांनी भारतात आली. तिने भारतात येताच महाकुंभमेळ्यात हजेरी लावली.  महाकुंभमेळ्याला जाऊन तिने संन्यास घेतला आणि महामंडलेश्वर बनली.

दरम्यान ममता कुलकर्णीला संन्यास देऊन तिला महामंडलेश्वर बनवल्यानंतर किन्नर आखाड्यात भांडण सुरू झाली. अवघ्या 4-5 दिवसात ममता कुलकर्णीची किन्नर आखाड्यातून हालपट्टी करण्यात आली आहे. तिच्याकडून महामंडलेश्नर ही उपाधी काढून घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

संगम शहर प्रयागराजमधील किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर ममता कुलकर्णी हिला आता महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात आले आहे. याशिवाय आखाड्याचे लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्याकडून आचार्य महामंडलेश्वर हे पदही काढून घेण्यात आले आहे. दोघांनाही किन्नर आखाड्यातून बाहेर काढण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे.

अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने काही दिवसांपूर्वी महाकुंभात संन्यासाची दीक्षा घेतली होती. निवृत्त झाल्यानंतर ममता कुलकर्णी यांना किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर करण्यात आले, याला कडाडून विरोध झाला आणि किन्नर आखाड्यात मोठी बेबनाव सुरू झाली.

ममता कुलकर्णीला संन्यास देऊन तिला महामंडलेश्वर ही उपाधी दिल्यानंतर यावर आखाड्यातील अनेक संतांनी तीव्र आक्षेप नोंदवल्याची चर्चा आहे. कुलकर्णी महामंडलेश्वर बनवल्याप्रकरणी किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्यावर कारवाई होऊ शकते, असे मानले जात आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group