".....तर त्यानं त्या गाणं लिहिणाऱ्याला वाचवावं" ; भाईजानला पुन्हा धमकी
img
Dipali Ghadwaje
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला येणाऱ्या धमक्यांचं सत्र कमी होण्याचं नाव घेत नाही. सलमान खानला सातत्यानं जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे. अशातच सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. बिश्नोई गँगकडून ही धमकी आल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, सातत्यानं येणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्या आणि बिश्नोई गँगकडून करण्यात आलेली माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या या पार्श्वभूमीवर सलमान खानला मोठी सुरक्षा पुरवण्यात आली आहे. 

सलमान खानचं वांद्रे येथील घर, त्यानंतर तो जिथे जाईल ते शुटिंग डेस्टिनेशन किंवा सेट सगळीकडे पोलिसांचं मोठं वलय पाहायला मिळत आहे. अशातच सलमान खाननंतर बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानलाही धमकी आल्याची माहिती मिळत आहे. 

चाहत्यांचा लाडका भाईजान अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा बिष्णोई गँगकडून धमकी वजा मेसेज आला असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला सलमानला आलेल्या धमकीचा मेसेज आला आहे. गुरूवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास सलमान खानला धमकी देणारा  धमकी वजा मेसेज आला  आहे. 

धमकीच्या मेसेजमध्ये सलमान खान आणि लॉरेन्स बिष्णोई याच्यावर लिहिण्यात आलेल्या गाण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. सलमान खान आणि लॉरेन्स बिष्णोई यांच्यावर गाण लिहिण्यात आलेल्या आहे, ज्यानं कोणी गाणं लिहिलं आहे, त्याला आम्ही सोडणार नाही, असं धमकीच्या मेसेजध्ये नमूद करण्यात आलं आहे.

फक्त एकच महिना... एकाच महिन्याच्या आत गाण लिहिणाऱ्या व्यक्तिला मारणार, गाणं लिहिणाऱ्याची हालत अशी करणार की, तो यापुढे नव्यानं गाणं लिहूच शकणार नाही, असं मेसेजमध्ये लिहिलं आहे. सलमान खानमध्ये दम असेल तर त्यानं त्या गाणं लिहिणाऱ्याला वाचवावं... लॉरेन्स बिष्णोई गँग, असा मजकूर धमकीवजा इशाऱ्यात लिहिण्यात आला आहे. या प्रकरणी आता मुंबई पोलीस सतर्क झाले असून पोलीस ज्या नंबरहून हा मेसेज आला आहे, त्याचा शोध घेत आहेत."

किंग खानलाही जीवे मारण्याची धमकी 

बिश्नोई गँगनं सलमान खानला दिलेल्या धमकीचं प्रकरण ताजं असतानाच आता बॉलिवूडचा किंग शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मुंबईच्या वांद्रे पोलीस स्थानकात धमकीचा हा फोन आल्यानं एकच खळबळ माजली आहे. छत्तीसगडच्या रायपूरमधून हा धमकीचा फोन होता. शाहरुख खान धमकी प्रकरणी नोटीस दिलेल्या फैजान खाननं दिली मोबाईल चोरीला गेल्याची माहिती दिली आहे. त्यानं पोलिसांत तक्रारही दिली होती, अशी माहिती मिळत आहे. अशातच आता मोबाईल चोरणाऱ्या आणि धमकी देणाऱ्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group