बॉलिवूडला कुणाची नजर लागली? सलमान, रोहीतनंतर आता रणवीर सिंहला धमकी
बॉलिवूडला कुणाची नजर लागली? सलमान, रोहीतनंतर आता रणवीर सिंहला धमकी
img
वैष्णवी सांगळे
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘धुरंधर 2’ मुळे चर्चेत असतानाच त्याला एका गंभीर धमकीचा सामना करावा लागला आहे. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, रणवीरला व्हॉट्सअ‍ॅपवर वॉइस नोटद्वारे धमकी देण्यात आली असून त्याच्याकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती मिळाली आहे. ही धमकी मिळाल्यानंतर रणवीरने तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रणवीरच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड बिष्णोई गँगच्या रडारवर आलं आहे. सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर गोळ्या झाडण्यात आल्या. याचा तपास सध्या मुंबई क्राइम ब्रांच अशातच आता बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहला धमकी मिळाली आहे. एवढंच नाहीतर, व्हॉट्सअपवरच्या एका धमकीवजा मेसेजनंतर कोट्यवधी रुपयांची मागणीसुद्धा करण्यात आली आहे.                       

व्हॉट्सअॅपवर धमकीची वॉईस नोट मिळाल्यानंतर अभिनेत्यानं पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रं हलवली. सध्या पोलीस धमकीचा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. दरम्यान, रणवीर सिंह किंवा त्याच्या टीमनं अद्याप औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही. तर, दुसरीकडे रणवीर सिंहच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.                            

दरम्यान, रणवीर सिंह त्याच्या स्पाय थ्रिलर 'धुरंधर'च्या जबरदस्त यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 1,300 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आणि आदित्य धर दिग्दर्शित सिनेमानं भारतात 1,000 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group