बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही तिच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. ऐश्वर्याने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिली असून तिचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे.
मागील काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या अभिषेकपासून विभक्त होणार असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसली. मात्र, यावर ना ऐश्वर्या ना बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाही. ऐश्वर्या राय ही अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर सलमान खानला डेट करत होती.
ऐश्वर्या राय हिचे चित्रपट धमाका करतात. मात्र, एका चित्रपटामुळे ऐश्वर्याच्या आयुष्यात खूप मोठी समस्या निर्माण झाली होती. हेच नाही तर तिला अनेक कायदेशीर नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. एक किस तिला खूप जास्त महागात पडली होती. आपल्यासोबत हे नेमके काय सुरू आहे ऐश्वर्या देखील कळत नव्हते. हृतिक रोशनसोबत ऐश्वर्याने धूम 2 मध्ये काम केले होते.
या चित्रपटात तिचा आणि हृतिक रोशनचा एक किसचा सीन होता. जो तूफान वादात सापडला. किसचा सीन जरी चित्रपटात असला तरीही तिच्या खऱ्या आयुष्यात समस्या वाढल्या. या लिपलॉकमुळे तिला तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूप तणावाातून जावे लागले. एका मुलाखतीत याबद्दल ऐश्वर्याने खुलासा देखील केला आणि आपल्यासोबत नेमके काय घडत होते, हे तिने सांगितले.
ऐश्वर्या राय म्हणाली की, मी धूम चित्रपटात एक किसचा सीन केला होता. ज्याची खूप म्हणजे खूप जास्त चर्चा रंगली. मी हैराण होते. मला देशभरातून लोकांनी कायदेशीर नोटीस पाठवल्या. मी फक्त एक अभिनेत्री आहे आणि माझं काम केले. दोन सेकंदांच्या त्या किसच्या सीनमुळे लोकांनी मला जबाब मागितले.
सध्या ऐश्वर्या आपल्या मुलीसोबत अनेकदा विदेश दौऱ्यावर जाताना दिसते. यावरून देखील काही नेटिझन्सकडून तिला टीका सहन करावी लागली आहे. “तिची मुलगी भारतात न शिकता विदेशात का शिकते?”, यावरून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. या टीकेमुळे ऐश्वर्या पुन्हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरली होती.