भारत आणि पाकिस्तान तणावात कायमच पाकिस्तानची बाजू घेणाऱ्या तुर्कीला दणका देण्यास भारताने सुरुवात केली आहे. तुर्कीतून येणाऱ्या सगळ्याच वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहिम देशात सुरू झाली आहे.
भारताविरोधात चुकीच्या बातम्या आणि भ्रामक माहिती पसरवण्याचे काम करणाऱ्या तुर्कीच्या टीआरटी वर्ल्ड ब्रॉडकास्टरचे ट्विटर अकाउंट भारतात बंद करण्यात आले. टूरिस्ट कंपन्यांनीही तुर्कीच्या विमान आणि हॉटेल बुकिंग बंद केले. यातच तुर्कीला आणखी एक दणका बसला आहे.

आता भारतीय फिल्म इंडस्ट्रीनेही तुर्कीला धडा शिकवण्याचा निश्चय केला आहे. भारतीय चित्रपट आणि टिव्ही शोचे तुर्कीत होणारे शुटिंगवर इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने बंदी घातली आहे.
भारताकडून सध्या तुर्की विरोधात कठोर निर्णय घेतले आहेत. आता इंडियन फिल्म इंडस्ट्रीने मोठा निर्णय घेतला आहे. असोसिएशनने तुर्कीत कोणताही भारतीय चित्रपट, टेलीविजन शोच्या चित्रीकरणावर बंदी घातली आहे.