मोठी बातमी : जम्मू-काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना ; दल सरोवरमध्ये पर्यटकांची बोट उलटली, व्हिडीओ आला समोर
मोठी बातमी : जम्मू-काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना ; दल सरोवरमध्ये पर्यटकांची बोट उलटली, व्हिडीओ आला समोर
img
Dipali Ghadwaje
जम्मू-काश्मीरमध्ये देशभरासह परदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने येतात. पर्यटन हे या राज्याच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहे. दल सरोवर हे येथील सर्वात प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने या ठिकाणी पर्यटक येत असतात. मात्र अशातच  जम्मू - काश्मीरच्या श्रीनगरमधील प्रसिद्ध दल सरोवरमध्ये मोठी दुर्घटना घडली. जोरदार वाऱ्याच्या तडाख्यामुळं पर्यटकांनी भरलेली बोट उलटली. 

मिळालेल्या माहितीनुसार , बोटीतील पर्यटक पाण्यात पडले. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. दल सरोवरमध्ये पर्यटकांची बोट उलटून मोठी दुर्घटना घडली. सुसाट वाऱ्यामुळं बोट उलटली. त्यातील पर्यटक सरोवरमधील पाण्यात पडले. काही पर्यटक जीव वाचवण्यासाठी धावा करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या दुर्घटनेनंतर स्थानिक आणि पोलिसांच्या माध्यमातून बचावकार्य आणि मदतकार्य सुरू करण्यात आले. सरोवरमध्ये उलटलेल्या बोटीत नेमके किती पर्यटक होते, याची आकडेवारी समोर आली नाही.

व्हिडिओ आला समोर ? 

दल सरोवरमधील दुर्घटनेचा १७ सेकंदाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सरोवरालगत असलेल्या रेलिंगजवळ मोठ्या संख्येने लोक जमा झाले आहेत. काही लोक मोबाइलवर व्हिडिओ रेकॉर्ड करताना या व्हिडिओत दिसून येते. दुसरीकडे, सरोवरमध्ये उलटलेली बोट दिसत आहे. काही लोक पाण्यात पडले असून, ते बचावासाठी धावा करत आहेत. त्यांचा जीव वाचवण्यासाठी काठावर असलेल्या गर्दीतील माणसं आरडाओरडा करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group