शस्त्रसंधीनंतर भारत आणि पाक यांच्यातील तणाव निवळेल, अशी चिन्हे होती. पण त्याची शक्यता कमीच वाटतेय.आज जम्मू काश्मीरमध्ये ४ दहशतवाद्यांनी भारतात घुसण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्याने परिसराला घेराव घातलाय. मागील दोन ते तीन तासांपासून भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.
भारताच्या लष्कराने एका लष्कर ए तोयबाच्या एका दहशतवाद्याला यमसदनी पाठवलेय. तर तीन जणांना घेराव घातलाय. शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे.
दहशतवाद्याविरोधात भारताचे ऑपरेशन सिंदूर सुरुच आहे. भारतावर झालेल्या कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला आता युद्ध म्हणूनच पाहिले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकावून सांगितलेय.