"...म्हणून तुर्कीच्या सफरचंदावर पुण्यातील व्यापाऱ्यांनी टाकला बहिष्कार
img
Dipali Ghadwaje
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पापांचा मृत्यू झाला, त्याचा बदला घेण्यासाठी बारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. मात्र त्यानतंर पाकने कुरापती करत भारतावरच उलटून हल्ला केला. त्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावले आणि त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

भारत पाकमधील तणावाच्या परिस्थितीदरम्यान जगातील बहुतांश देशांनी दहशतवादाचा निषेध करत भारताला पाठिंबा दर्शवला. मात्र काही कुरापती देशांनी दहशतवाद पोसणाऱ्या पाकचीच तळी उचलून धरली. तुर्की हा पण त्यापैकीच एक.

याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला भारतीय व्यापाऱ्यांनी धक्का दिला आहे. ‘बॅन तुर्की’ म्हणत व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या सफरचंदांव बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे तुर्की सफरचंद बाजारातून गायब झाली आहेत. परिणामी इराणमधून येणाऱ्या सफरचंदांचे दर वाढले आहेत. घाऊक बाजारात 10 किलो सफरचंदामागे 200 ते 300 रुपये, तर किरकोळ बाजारात प्रति किलो 20 ते 30 रुपये दराने वाढ झाली आहे.

तुर्कीच्या भूमिकेमुळे सफरचंदावर बहिष्कार, व्यापारी आक्रमक

तुर्कीने पाकला पाठिंबा दिल्यामुळे भारतातील व्यापारी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आता व्यापाऱ्यांनी तुर्की सफरचंदाऐवजी इराण, वॉशिंग्टन आणि न्यूझलँड सफरचंदाला पसंती दिली आहे. इराण, वॉशिंग्टन आणि न्यूझलँड सफरचंदाच्या भावात पेटीमागे 200 ते 300 रूपयांची वाढ झाली आहे. मार्केट यार्डात देशासह परदेशातून सफरचंदाची आवक होत असते. भारत-पाकिस्तान तणावामुळे परदेशातील सफरचंदाच्या व्यवहारा वरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group