मोठी बातमी : कराचीत ५ मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, दुर्घटनेत २७ जणांचा मृत्यू ; पण 'ती' आश्चर्यकारकरित्या बचावली
मोठी बातमी : कराचीत ५ मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, दुर्घटनेत २७ जणांचा मृत्यू ; पण 'ती' आश्चर्यकारकरित्या बचावली
img
DB
गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात एक प्रवासी आश्चर्यकारकरित्या बचावला होता. त्यानंतर आता अशीच एक घटना पाकिस्तान मधून समोर आली आहे.  पाकिस्तानात इमारत कोसळल्यानंतरही एक चमत्कार घडला. कराचीत पाच मजली इमारत कोसळून २७ जणांचा मृत्यू झाला.

या अपघातात एका हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू झाला आहे. याच कुटुंबातील एक ३ महिन्याची चिमुकली आश्चर्यकारकरित्या बचावली. गुजरातच्या अहमदाबादानंतर आता पाकिस्तानातही चमत्कार घडल्याचे दिसून आले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार , इमारत दुर्घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत एका हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू झाला. २० जण एकमेकांचे नातेवाईक होते. या भीषण दुर्घटनेतूनही तीन महिन्यांची चिमकुली आश्चर्यरिकरित्या बचावली.

बचाव करणाऱ्या पथकातील एका कर्मचाऱ्याने सांगितलं की, 'आम्हाला ढिगाऱ्याखाली एक जिवंत मुलगी आढळली. परंतु चिमुकलीची आई आणि कुटुंबातील लोकांचा मृत्यू झाला आहे. नागरिकांची शोधाशोध करताना चिमुकलीच्या शरीरावर किरकोळ जखम झाल्याने नाकातून रक्त येत होतं. त्या व्यतिरिक्त चिमुकलीच्या शरीरावर कोणतेही जखमा नव्हत्या.

'चिमुकली जिथे सापडली, त्याजवळच आईचा मृतदेह आढळला. ढिगाऱ्याखालून आईचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. हिंदू कुटुंबातील इतर सदस्यांचाही मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत, असेही कर्मचारी मजहर यांनी सांगितलं.

'इमारत कोसळल्यानंतर ढिगारा अंगावर पडू लागला, त्यावेळी आईने मुलीला दूर फेकलं असेल. त्यामुळे चिमुकलीचा जीव वाचला असेल, असेही मजहर यांनी सांगितलं.

दरम्यान, तेथील सरकारचा दावा आहे की, परिसरातील २२ इमारती जीर्ण झाल्या होत्या. त्यातील १४ इमारती रिकाम्या केल्या होत्या. कोसळलेली इमारत देखील जीर्ण झाली होती. इमारत कमकुवत झाल्याने ५ मजली इमारत कोसळल्याचा दावा स्थानिक प्रशासाकडून करण्यात येत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group