पाकिस्ता मधून एक मोठी बातमी समोर येत आहे भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी शाहिद लतीफ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. तो पाकिस्तानात लपून बसला होता. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या महितीनूसार शाहिद लतीफ हा पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आणि पठाणकोट येथे झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. तो पाकिस्तानातील सियालकोटमध्ये लपून बसला होता. शाहिद लतीफ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.