खळबळजनक : पाकिस्तानमधून
खळबळजनक : पाकिस्तानमधून "या" जिल्ह्यात धमकीचा फोन , कारखाना बॉम्बने उडवून देण्याची धमकी
img
Dipali Ghadwaje
भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण वाढले आहे. या तणावाच्या वातावरणात अनेक धमकीचे मेल आणि कॉल येत आहेत. मुंबईनंतर आता अमरावतीत धमकीचा फोन आला आहे. पाकिस्तानातून धमकीचा फोन आला. अमरावतीमध्ये कारखाना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीमध्ये पाकिस्तानमधून धमकीचे फोन आलेत. +92 च्या नंबरवरून व्हाट्सअॅपवर ४ वेळा ऑडिओ कॉल आले होते. नांदगाव पेठच्या कंपनीतील कर्मचारी आणि कारखाना बॉम्ब उडवून देण्याची धमकी देण्यात आली. घाबरलेल्या कर्मचाऱ्याने नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी तक्रार दिली. अमरावती पोलिस याचा तपास करत आहेत.

अमरावतीच्या पोलिसांनी तात्काळ केंद्रीय गृह मंत्रालयाला याबाबतची माहिती दिली. अमरावती शहर आणि ग्रामीण पोलिस हायअलर्टवर आहेत.

अमरावती पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी आवाहन केले आहे की, अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास न उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. सध्या अमरावती शहर पोलिसांची सोशल मीडिया अकाऊंटवर करडी नजर आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group