सारसबागमध्ये दिवाळी पहाटला 2 गटात तुफान हाणामारी
सारसबागमध्ये दिवाळी पहाटला 2 गटात तुफान हाणामारी
img
दैनिक भ्रमर


पुणे (भ्रमर वृत्तसेवा):- गेल्या 28 वर्षांपासून पुण्यातील सारसबागेतील दिवाळी पहाटचा कार्यक्रम यंदाच्या वर्षी देखील आयोजित केला होता.

हिंदुत्ववादी संघटनांकडून झालेल्या तीव्र विरोधामुळे आणि समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या धमकीवजा इशार्‍यामुळे आयोजकांनी हा कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा केली होती. मात्र, पुणे पोलिसांनी यात मध्यस्थी केल्यानंतर हा कार्यक्रम होणार असल्याचं आयोजकांनी जाहीर केलं. अशातच आता सारसबागेतील कार्यक्रमात राडा झाल्याचं पहायला मिळालं आहे.

पुण्यात दिवाळी पाडवा पहाटचा उत्सव सारसबागेत आयोजित केला जातो. मात्र, यंदाच्या वर्षी सारसबागेत दोन गटात वाद पेटल्याचं पहायला मिळालं. कार्यक्रमावेळी राडा झाला. त्यामुळे सारसबागच्या दिवाळी पहाटच्या अभूतपूर्व कार्यक्रमाला गालगोट लागल्याचं चित्र यंदा पहिल्यांदाच पहायला मिळालं आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group