५ डिसेम्बर २०२५
सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढे व प्रिन्स सिंग यांना नेपाळ बॉर्डरवरून गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने जेरबंद केले होते.
दोघांच्या शोधासाठी गुन्हे शाखेच्या पथकाने राजस्थान येथील कोटपूतली जिल्ह्यात जाऊन तांत्रिक विश्लेषण करून अहोरात्र परिश्रम घेत शोध घेतला असता आरोपी त्या ठिकाणी मिळून आले नाही म्हणून मानवी कौशल्याचा वापर करून माहिती घेतली.
गोपनीय रित्या माहिती काढली असता भूषण लोंढे व प्रिन्स सिंग हे नेपाळ बॉर्डर जवळ राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवर जाऊन त्यांना छापा मारून ताब्यात घेतले. दोघांना अटक केल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोघांना 12 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Copyright ©2026 Bhramar