दिल्ली-एनसीआरभूकंपाच्या धक्यांनी हादरले आहे. दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भारतासह पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवलेत. एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार , खैबर पख्तूनख्वापासून ते पंजाबपर्यंत या भूकंपाचे धक्के जाणवलेत. या भूकंपाची तीव्रता रेश्क्टर स्केल ५.७ नोंदवली गेली. या भूकंपाचे केंद्र डेरा गाझी खान जवळ असून जमिनीखाली १० किलोमीटर खोल होते.
यामुळे भुपृष्ठभागावर याची तीव्रता कमी जाणवली. भारत, पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानसह अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे कोणत्याच प्रकारची जीवितहानी झाली नाहीये.
या भूकंपाचे धक्के भारतातील उत्तर भागातील अनेक राज्यात जाणवले. दिल्ली, पश्चिम यूपी, हरियाणा, जम्मू-काश्मीर आणि पंजाबसह अनेक राज्यातही भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली, पश्चिम यूपी, हरियाणा, जम्मू-काश्मीर आणि पंजाबसह अनेक राज्यातही भूकंपाचे धक्के जाणवले.
नॅशनल सेंटर फॉर सेसमोलॉजीनुसार भूकंप १२.५८ मिनिटांनी आला होता. सेंटर फॉर सेसमोलॉजीनुसार, भूकंपाची तीव्रता ६ पेक्षा कमी असेल तर तो भूकंप धोकेदायक नसतो. परंतु या भूकंपाचं केंद्र जमिनीच्या जास्त खाली नव्हतं, त्यामुळे या भूकंपामुळे अधिक हानी होण्याची शक्यता होती. अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपाची तीव्रता ५.८ नव्हते तर ५.४ इतकी तीव्रता होती.
त्यानुसार पाकिस्तानमधील पंजाब राज्यात एकापेक्षा जास्त शहरात याचे धक्के जाणवले. यात मियांवली, खानेवाल, टोबा टेक सिंह, गुजरात, सरगोधा आणि झांग या शहराचा समावेश आहे. यासह इस्लामाबाद, मुल्तान आणि लाहौरमध्येही भूकंपाचे झटके जाणवले. तर खैबर पख्तूनख्वाच्या पेशावरसह स्वात घाटी, उत्तरी वझिरिस्तानातही भूकंपाचे धक्के जाणवलेत.