महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात चार तासांत भूकंपाचे ११ धक्के, लोकांमध्ये भीतीचं वातावरण
महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात चार तासांत भूकंपाचे ११ धक्के, लोकांमध्ये भीतीचं वातावरण
img
वैष्णवी सांगळे
गुजरातमध्ये मोठा भूकंप झाला आहे. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. गुजरातच्या राजकोट जिल्ह्यात अवघ्या ४ तासांमध्ये भूकंपाचे एकामागून एक तब्बल ११ धक्के जाणवले आहेत. भूकंपाचे तीव्रता स्तर सौम्य असल्यामुळे सध्या कोणत्याही प्रकारच्या जीवितहानी किंवा मालमत्तेच्या नुकसानीची नोंद अद्याप तरी नोंदवण्यात आलेली नाही.

माहितीनुसार, शुक्रवारी सकाळच्या सुमारास गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातल्या उपलेटा परिसरात हे भूकंपाचे धक्के जाणवले. या परिसरात अवघ्या ४ तासांमध्ये तब्बल ११ भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज सकाळी पहाटे 6.19 पहिला भूकंपाचा धक्का जाणवला हा पहिला भूकंपाचा धक्का 3.8 रिस्टल स्केल एवढा तीव्रतेचा होता. त्यानंतर एका पाठोपाठ १० भूकंपाचे धक्के जाणवले. 

भूकंपाचा पहिला धक्का जाणवताच नागरिकांनी घराच्या बाहेर धाव घेतली. त्यानंतर एकामागून एक भूकंपाचे धक्के जाणवत असल्यामुळे आता लोक घरात जायला देखील घाबरू लागले आहेत. हे सर्व भूकंपाचे धक्के सौम्य होते, यामध्ये फार काही नुकसान झालेलं नाही, 2.7 ते 3.8 रिस्टर स्केल एवढ्या तीव्रतेचे हे भूकंप होते.अचानक आलेल्या या मोठ्या संकटामुळे जिल्ह्यातील लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहेत, नागरिक प्रचंड घाबरले आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र सतर्क रहावे असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group