पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबादमध्ये बजावला मतदानाचा हक्क....
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबादमध्ये बजावला मतदानाचा हक्क....
img
Dipali Ghadwaje
देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसरा टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. या तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील 11 जागा आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. अहमदाबादमध्ये जाऊन त्यांनी मतदानाचं कर्तव्य पार पाडलं. निशान पब्लिक स्कूलमध्ये जाऊन नरेंद्र मोदींनी मतदान केलं. त्यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही मतदानाचं कर्तव्य पार पाडलं. 

तिस-या टप्प्यात 12 राज्ये, केंद्राशासित प्रदेशातील 94 जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये गुजरातमधील सर्वच म्हणजे 26 जागा, कर्नाटकातील 14 , उत्तर प्रदेशातील 10 , मध्य प्रदेशातील 8  आणि छत्तीसगडमधील 7  आणि महाराष्ट्रातील 11  लढतींचा समावेश आहे. 

 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही नरेंद्र मोदी यांनी याच मतदान केंद्रावर येऊन मतदान केले होते. रानिप हा भाग गांधीनगर लोकसभा मतदार संघात येतो, येथून भारतीय जनता पक्षाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना उमेदवारी दिली आहे.

दरम्यान मतदानानंतर मोदींनी माध्यमांशी संवाद साधला. जास्तीत जास्त लोकांनी घराबाहेर पडून आपलं मतदानाचं कर्तव्य पार पाडा,असं आवाहन मोदींनी जनतेला केलं.  यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत त्यांनाही प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला. ‘या उन्हात तुम्ही लोक रात्रंदिवस फेऱ्या मारत आहात. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी करावी. माध्यमांमध्ये सध्या बरीच स्पर्धा आहे. इकडे-तिकडे आधी धावावे लागते’ असे सांगत त्यांनी माध्यमकर्मींना उन्हात सांभाळून राहण्याचा आणि जास्तीत पाणी पिण्याचा सल्ला दिला.

आज मतदानाचा तिसरा टप्पा आहे, मी देशवासियांना आवाहन करेन की लोकशाहीत मतदान हे साधे दान नाही, आपल्या देशात दानाला महत्त्व आहे. देशवासीयांनी जास्तीत जास्त मतदान करावे. इथेच मी नियमितपणे मतदान करतो. मी काल रात्री आंध्रहून आलो. आत्ता सध्या गुजरातमध्ये आहे. अजून मध्य प्रदेशात जायचे आहे. तेलंगणमध्येही जायचे आहे असे पंतप्रधान म्हणाले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group