भारताचा शेजारी बांग्लादेशात गुरुवारी (ता.12) निवडणूक पार पडली. तब्बल 300 सदस्य असणाऱ्या बांग्लादेशाच्या संसदेत उजव्या विचारसरणीचा बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला (बीएनपी) बहुमत मिळाले आहे. बीएनपीने तब्बल 200 चे आकडा पार केला आहे. बीएनपीचे प्रमुख तारिक रहमान हे पंतप्रधान होणे निश्चित आहेत.
मागच्यावर्षी शेख हसीना यांना सत्तेतून बेदखल केल्यानंतर या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुका आहेत. या निवडणुकीत शेख हसीना यांच्या अवामी लीग पार्टीवर निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्यात आली होती. सध्या बांग्लादेशात युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार आहे. बांग्लादेशात काल मतदान झाल्यानंतर काही वेळाने मतमोजणीला सुरुवात झाली होती. आज सकाळपर्यंत बांग्लादेशात निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे. बांग्लादेश राष्ट्रवादी पार्टीने (BNP) आपला जुना सहकारी पक्ष जमात-ए-इस्लामीवर मात केली आहे. बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान दिवंगत बेगम खालिदा जिया यांची पार्टी बीएनपी जवळपास 20 वर्षानंतर सरकार बनवण्याच्या स्थितीत आहे.
बीएनपी आघाडीला 211 जागा, जमातला 70 आणि अन्यनी 6 जागा जिंकल्या आहेत. एकूण 299 मतदार संघांपैकी 287 मतदारसंघात मतमोजणी पूर्ण झालीय. रिपोर्टवरुन बीएनपीने ही निवडणूक जिंकल्याचे संकेत मिळत आहेत. बीएनपीचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचा पुत्र तारिक रहमानने आपला गृह जिल्हा बुगुरामधून निवडणूक जिंकली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. निवडणूक अधिकाऱ्यानुसार, रहमान यांना 2,16,284 मतं मिळाली, तर प्रतिस्पर्धी उमेदवार आबिदुर रहमान यांना 97,626 मतं मिळाली.
बीएनपीचा इतिहास
बीएनपी पक्षाची स्थापना झियाउर रहमान यांनी 1978 मध्ये केली होती. या इस्लामिक कट्टर उजवी विचारसरणी असलेला हा पक्ष आहे. झियाउर रहमान हे बांग्लादेशचे राष्ट्रपती होते. तर, त्यांची मुलगी खालिदा झिया यांनी पंतप्रधान पद भूषवले आहे. आता त्यांचे पुत्र तारिक रहमान हे बीएनपीचे नेतृत्व करतात. निवडणुकीत ते ढाका आणि बोगरा या दोन जागांवरून विजय मिळवला आहे.