नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : प्रभाग क्रमांक २६ मधील खुटवडनगरमधील एका बुथवर उमेदवारा शेजारील बटन दाबले जात नसल्याने मतदान केंद्रात काही काळ गोंधळ उडाला होता.
ही माहिती समोर आली मशीन बदलूनही तोच प्रकार घडल्याने या ठिकाणी नवीन मशीन लावून प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.याबाबत उपलब्ध माहिती अशी की, नवीन नाशिक परिसरातील खुटवडनगर येथे दक्षिणमुखी मारुती मंदिराजवळ असलेल्या प्रभाग क्रमांक 26 च्या एका केंद्रात भाजप पुरस्कृत असलेल्या मोहीनी अशोक पवार यांच्या नावासमोरील बटन दाबले जात नसल्याची तक्रार करण्यात आली होती.
त्यानंतर या ठिकाणी उपस्थित अधिकार्यांनी तातडीने दुसरे मतदान यंत्र बसविले. मात्र पुन्हा तोच प्रकार घडल्याने याबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकार्यांना देण्यात आल्यानंतर नवीन मशिन बसविण्यात आले.